
Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांपैकी एक असणाऱ्या आय.टी.पार्कच्या जागेचा प्रश्न अजूनही कायम आहे. जिल्हा प्रशासनाने कृषी महाविद्यालयाला ज्या पर्यायी जागा दाखवल्या, त्यातील एकही प्रस्ताव कृषी महाविद्यालयाला मान्य नाही. सांगरूळ येथील जागा कृषी महाविद्यालयाला मान्य असली तरी सध्या ही जागा वनविभागाच्या अखत्यारीत आहे. या जागेचे निर्वनीकरण करणे आवश्यक आहे; पण त्याची प्रक्रिया मोठी असल्याने वेळ लागणार आहे. तूर्तास आयटी पार्कच्या जागेचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे.