esakal | रुग्णसेवा हीच ईश्‍वरसेवा ; डॉ. अजय केणी अनुभवतात कोरोना पलीकडचे जग 
sakal

बोलून बातमी शोधा

Patient service is God's service; Dr. Ajay Kenny experiences the world beyond Corona

रुग्णांवर उपचार करणे हेच कर्तव्य मानतात. रुग्णांच्या, नातेवाईकांच्या, प्रशासनाच्या, लोकप्रतिनिधींच्या दबावानंतरही ते आपली सेवा नियमित ठेवत आहेत. कोरोनाच्या पलीकडील जग ते रोज अनुभवतात. डॉ. अजय केणी असे त्यांचे नाव, त्यांचे अनुभव त्यांच्याच शब्दात..

रुग्णसेवा हीच ईश्‍वरसेवा ; डॉ. अजय केणी अनुभवतात कोरोना पलीकडचे जग 

sakal_logo
By
लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : त्यांच्या दोन एन्जोप्लास्टी झाल्या. त्यांचे वय 55 पेक्षा अधिक, अशा काळात त्यांनी कोरोनाच्या भीतीने घरी राहणेच योग्य होते; पण ते रोज 14-16 कधी कधी 18 तास अहोरात्र काम करतात. चार महिने रजा नाही की आईचा चेहरा पाहिलेला नाही. औरंगाबादेतील डॉक्‍टर मुलगीशीही ते बोलू शकत नाहीत. रुग्णांवर उपचार करणे हेच कर्तव्य मानतात. रुग्णांच्या, नातेवाईकांच्या, प्रशासनाच्या, लोकप्रतिनिधींच्या दबावानंतरही ते आपली सेवा नियमित ठेवत आहेत. कोरोनाच्या पलीकडील जग ते रोज अनुभवतात. डॉ. अजय केणी असे त्यांचे नाव, त्यांचे अनुभव त्यांच्याच शब्दात... 
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पहिल्यांदा खासगी रुग्णालयात आला. तेव्हापासून आजपर्यंत सलग ड्यूटी सुरू आहे. एकदा पीपीई किट घातले की ते सहा तास काढत नाही. मास्क, हुड, मोजे यामुळे घामाघुम होतो, घुसमटायला होते. पीपीई किटमध्ये सहा तास टॉयलेट-बाथरूमला जाता येत नाही. काही खाता-पिता येत नाही. रुग्ण हाक मारतात, पण ऐकू येत नाही. रुग्णांची वाढती संख्या आणि अपुरी यंत्रणेमुळे नेहमीप्रमाणे सुविधा देणे शक्‍य नाही. 
आयसीयुतील रुग्णांचे व्हिडिओ कॉलिंग करून नातेवाइकांना दाखविला जातो. आम्ही काय उपचार करतोय, की नाही यावर नातेवाइकांचा विश्‍वास बसत नाही. सरकारी दराने उपचार करूनही आमदार, खासदारांचे फोन येतात. बिल कमी करण्यासाठी दबाव येतो. अधिकाऱ्यांच्या सूचनांचा भडिमार असतो. घाबरलेल्या रुग्णांना कौन्सिलिंग करून मानसिक संतुलन ठेवावे लागते. 
चिडचिड होते. यातूनही आम्ही प्राणायाम, व्यायाम, योग्य आहार घेऊन फिट ठेवण्याचा प्रयत्न करतो. घरी थेट बेडरुम आणि तेथून पुन्हा हॉस्पिटलला येतो. बरं झाल्यानंतर रुग्ण आणि नातेवाईक आभार मानतात. याचा आत्मिक आनंद होतो. 

रुग्णाचे व्हिडिओ चित्रीकरण 
एक रुग्ण दगावला. तो पॉझिटिव्ह असल्यामुळे बॉडी बांधली, मात्र नातेवाइकांनी ती ताब्यात घेतली नाही. तो मृतदेह आमच्या रुग्णाचा आहे, कशावरून असे विचारले. चेहरा उघडा करून त्यांना दाखविला. त्यानंतर अंत्यसंस्कारास परवानगी दिली. आता रुग्णाचे व्हिडिओ चित्रीकरण करूनच नातेवाइकांना दाखवितो. 

प्रॅक्‍टिस बंद करावे वाटते पण... 
सकाळी उठल्यानंतर प्रॅक्‍टिस बंद करून खेडेगावात जाऊन राहावे, असे वाटते; पण प्रत्येक डॉक्‍टरने असा विचार केला तर उपचार कोण करणार? त्यामुळे पुन्हा हॉस्पिटलला यावे लागते. या कोरोना महामारीत चार महिने डॉक्‍टरांनी पगार घेतले नाहीत. ज्या नर्स, वॉर्डबॉय यांना तीस हजारांच्या आत पगार आहे त्यांना तो नियमित मिळेल, अशी व्यवस्था केली आहे. 

loading image
go to top