
योजनेचे जिल्हा समन्वयक तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जवळपास ७० हून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत.
कोल्हापूर : मोफत उपचाराची सुविधा देणारी महात्मा फुले जीवनदायी योजना (mahatma phule jan arogya yojana) वरदान ठरली आहे. जिल्ह्यातील २३ रूग्णालयात कोरोनावरही (Corona) उपचार होतात, मात्र बहुतेक रूग्णालयात कोरोना बाधितांना बेड (Bed) मिळाला नाही. योजनेत सहभाग न घेता रोखीने पैसे देऊन उपचार घेणाऱ्याला प्राधान्याने बेड दिला. योजनेतील रूग्णांना सक्षम सुविधा मिळाल्या नाहीत. रूग्णांकडून पैस घेतले अशा तक्रारी येत आहे. योजनेचे जिल्हा समन्वयक तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जवळपास ७० हून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. (patients did not get competent facilities from mahatma phule jan arogya yojana)
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत ९६० हून अधिक व्याधीवर मोफत उपचाराची सुविधा आहे. जिल्ह्यातील ३६ रूग्णालयातही योजना लागू आहे. यातील २३ खासगी रूग्णालयात कोरोनावर उपचाराही या योजनेत होतात. मात्र चार महिन्यात अनेक रूग्णालयांनी मोजक्याच कोरोनाबाधितावर उपचार केले तर बहुतांशी रूग्णालयात बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात येते. त्याच रूग्णालयात रोखीने पैसे भरून उपचार घेण्याची तयारी दर्शवल्यास मात्र बेड उपलब्ध होतो, असा अनुभव घेतलेले अनेकजण सांगतात.
इचलकरंजीतील एका मल्टीस्पेशालीस्ट हॉस्पीटलमध्ये योजनेचे नाव काढले तरी त्रागा करून योजनेचा लाभ घेता येणार नाही. आम्ही खासगीत कमी पैसे घेऊन उपचार करतो. असे सांगत रूग्णाला योजनेचा लाभ घेण्यापासून परावृत्त केल्याचा अनुभवही अनेकांनी घेतला आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत म्युकरमायकोसिस आजारावरील उपचाराचा समावेश आहे. त्यासाठी सहा रूग्णालयांचा समावेश आहे. यातील तीन रूग्णालयात उपचार होतात, तर उर्वर्रीत तीन रूग्णालयात म्युकरवर उपचाराची वेळ आल्यास बेड शिल्लक नाही असेही सांगितले जाते.
योजनेत केसरी शिधापत्रिका तसेच आधार कार्ड देऊन उपचाराला दाखल होता येते. कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारांवरही उपचाराची सुविधा आहे. संबंधित रूग्णालयात आरोग्यमित्र कार्यरत आहेत. त्यांच्याकडे नोंदणी केल्यानंतर आजाराची लक्षणे व उपचारासंबधी योजनेच्या राज्यस्तरीय समितीकडे तपशील पाठवले जातात. या समितीकडून मंजूरी आल्यानंतर उपचार होतात, मात्र समितीकडून उपचार होऊ शकत नसल्यास तसाही ‘रिप्लाय’ येतो. तेव्हा रूग्णालयात पैसे भरून उपचार घ्यावे किंवा शासकीय रूग्णालयात जावे लागते.
‘‘महात्मा फुले जनआरोग्य योजनेत जास्ती जास्त रूग्णांना लाभ देण्यात येतो. अनेक रूग्णालयांनी चांगली सेवा दिली. मात्र ज्या रूग्णांना उपचार सेवेत कमतरता जाणवली, उणिवा दिसल्यास अशा व रूग्णांकडून तक्रारी आल्या आहेत. त्याची दखल घेऊन चौकशी करण्यात येत आहे.
- डॉ. सुभाष नांगरे जिल्हा समन्वयक, महात्मा फुले जनआरोग्य योजना
(patients did not get competent facilities from mahatma phule jan arogya yojana)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.