
Rescue teams assist injured devotees after a tempo collided with their tractor trailer near Pattankodoli.
Sakal
हुपरी: ‘श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं’चा गजर करत मजल दरमजल करीत ते पट्टणकोडोलीत शनिवारी (ता. ११) रात्री दाखल झाले. दिवस उजाडण्याची वाट पाहत असतानाच अचानक त्यांच्यावर जीवघेणे संकट ओढवले. एका मालवाहू टेम्पोने रस्त्याकडेला थांबलेल्या त्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिली. त्यात ट्रॉलीत बसलेले वृद्ध, महिला व लहान मुले असे अकरा जण जखमी झाले.