Extortion kidnapping
sakal
कोल्हापूर - एक कोटीच्या खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करून कुटुंबीयांना धमकावल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार अजित तिवडे (४१, रा. रुईकर कॉलनी) याच्यासह चौघांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली. याबाबत नीलेश सुरेश जाधव (वय-३२, रा. मोरे-मानेनगर, कळंबा) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पसार लालाशेठचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी सांगितले.