Kolhapur News: थकीत एफआरपीवर १५% व्याजासह निर्णय मार्गी? साखर आयुक्तांच्या बैठकीत कारवाईची मोठी घोषणाबाजी
Pending FRP Payment: गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात एफआरपी थकवणाऱ्या ११ कारखान्यांकडून थकीत असणारी ३६ कोटी रुपयांची थकबाकी व्याजासह देण्याबाबत दोन दिवसांत निर्णय. संबंधित कारखान्यांकडून १५ टक्के व्याजासह थकीत एफआरपी शेतकऱ्यांना देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोल्हापूर: गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात एफआरपी थकवणाऱ्या ११ कारखान्यांकडून थकीत असणारी ३६ कोटी रुपयांची थकबाकी व्याजासह देण्याबाबत दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती साखर आयुक्त संजय कोलते यांनी आज दिली.