Good News - आता पेन्शन मिळणार घरपोच!

Good News - आता पेन्शन मिळणार घरपोच!
Summary

या नव्या वर्षात पात्र ठरलेल्या सुमारे पाच हजार पेन्शनधारकांची पोस्टात खाती उघडली जाणार आहेत.

इचलकरंजी : पेन्शनसाठी वृद्धांसह सर्वच लाभार्थ्यांचा त्रास आता वाचणार आहे. पेन्शनधारकांची वाढती संख्या आणि शहरात पेन्शन घेण्यासाठी दोनच बँकेच्या शाखा यामुळे ताण वाढतच आहे. यावर आता सुलभ उपाय शोधत पेन्शन वाटपाची नवी सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. लाभार्थ्यांच्या थेट घरपोच पेन्शनची रक्कम मिळेल. नव्याने नोंदणी झालेल्या सुमारे पाच हजार लाभार्थ्यांच्या पेन्शनची खाती आता पोस्ट कार्यालयात उघडली जाणार आहेत.

वृद्ध, दिव्यांगांची फरपट

शहरातील संजय गांधी निराधार योजना कार्यालयाचा आवाका मोठा आहे. इचलकरंजी शहरास आसपासची पाच गावे असल्याने पेन्शनधारकांची संख्या वाढतच आहे. सध्या ही लाभार्थ्यांची संख्या २१ हजारांच्या घरात पोहोचली आहे. मात्र, पेन्शन वाटपासाठी केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचा पर्याय आहे. शहरातील बँकेच्या दोन शाखांतूनच पेन्शन वाटप केले जाते. त्यामुळे प्रत्येक महिन्याला गर्दी, वादावादी अशा प्रसंगांना लाभार्थी आणि बॅंक प्रशासनाला सामोरे जावे लागत आहे. शिवाय वृद्ध, दिव्यांग व्यक्तींची फरपट नित्याचे चित्र दिसते. अशा परिस्थितीत पोस्ट कार्यालयाचा पर्याय समोर आला. याबाबत सकारात्मक निर्णय झाला आहे. येत्या काही दिवसांत नव्या लाभार्थ्यांना पोस्टातून पेन्शन दिली जाणार आहे.

Good News - आता पेन्शन मिळणार घरपोच!
PM Care Fund सरकाचा निधी नाही, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय

पोस्टमनच्या माध्यमतून सेवा

संजय गांधी निराधार कार्यालयाने गर्दीला आवर घालण्यासाठी टोकण वाटप यासह नानाविध शक्कल लढवली. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. या नव्या वर्षात पात्र ठरलेल्या सुमारे पाच हजार पेन्शनधारकांची पोस्टात खाती उघडली जाणार आहेत. पोस्टातून थेट लाभार्थ्यांच्या घरपोच पेन्शनची रक्कम मिळेल. पोस्टातील २२ पोस्टमन यांच्या माध्यमातून ही सेवा दिली जाईल. बँकेत नंबरात ताटकळत बसणे, लांबलचक रांगा, वृद्धांची फरपट, वारंवार हेलपाटे अशा समस्या आता पोस्टामुळे पुसून जाणार आहेत. यासाठी आता शासकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.

जिल्ह्यातील पहिला प्रयोग

पेन्शनधारकांसाठी शहरात राबवली जाणारी पोस्टाची सुविधा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग आहे. पेन्शनधारकांसाठी ही प्रक्रिया सुलभ ठरली , तर हा पॅटर्न जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही लागू होऊ शकतो. पोस्टात लाभार्थ्यांची खाती उघडल्यामुळे पेन्शनची रक्कम पेन्शनधारकांना भारतातील कोणत्याही पोस्ट कार्यालयातून काढता येणार आहे. पोस्टामुळे पेन्शन वाटप हे सुखकर होईल.

Good News - आता पेन्शन मिळणार घरपोच!
अवघ्या 48 तासांतच निर्णय फिरला; सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजची मान्यता रद्द

"पोस्टामार्फत पेन्शन वाटप ही संकल्पना चांगली आहे. यामुळे आम्हा दिव्यांग लाभार्थ्यांची फरफट थांबणार आहे. या निर्णयात सुसूत्रता आणून याचा लाभ द्यावा."

- धनाजी जाधव, पेन्शनधारक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com