तपासणीच्या तुलनेत कोरोना बाधितांचा टक्का वाढला, गडहिंग्लज उपविभागातील रूग्णांत 20 दिवसात वाढ

Percentage Of Corona Infections Increased Compared To Screening, Patients In Gadhinglaj Sub-Division Increased In 20 Days Kolhapur Marathi News
Percentage Of Corona Infections Increased Compared To Screening, Patients In Gadhinglaj Sub-Division Increased In 20 Days Kolhapur Marathi News
Updated on

गडहिंग्लज : गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍यातील एकूण स्वॅब व अँटीजेन तपासणीच्या तुलनेत बाधितांच्या टक्केवारीचा आलेख उंचावत असल्याचे चित्र समोर आले आहे. 20 दिवसातील एकूण तपासणीच्या तुलनेत 20.12 टक्केने बाधितांचे प्रमाण आढळले आहे. स्थानिक संसर्गाचा वेग वाढत असल्याचेच हे द्योतक आहे. यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर भर देण्याच्या मोहिमेने गती घेतली आहे. 

गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍यातील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेवून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शहरांसह ग्रामीण भागात जनता कर्फ्यू जाहीर झाला. बंदनंतर आजरा शहर कालपासून सुरू झाले. चंदगड, गडहिंग्लज अजूनही बंद आहे. या बंद काळातही रूग्णसंख्येचा आलेख वाढता राहिल्याने बंद हा कोरोनावर पर्याय आहे का, असा संभ्रम तयार होत आहे. गडहिंग्लज शहर व तालुक्‍यातील सर्व व्यवहार 7 सप्टेंबरपासून ठप्प आहेत.

शहरात सन्नाटा आहे. तरीसुद्धा येथे रोज सरासरी दहा ते बारा रूग्णांचा आढळ होत आहे. 22 ऑगस्ट रोजीची स्वॅब, अँटीजेन तपासणी आणि बाधितांच्या प्रमाणावर नजर टाकली असता 11 सप्टेंबर रोजी आलेल्या आकडेवरून रूग्णसंख्येची वाढ लक्षणीय असल्याचे समोर आले आहे. या आकडेवारीनुसार गडहिंग्लजचा मृत्यू दर अर्ध्या टक्‍क्‍याने वाढून तो 4 टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. चंदगडच्या मृत्यूदरात एक टक्‍क्‍याहून अधिक वाढला आहे. आजऱ्याचा मृत्यू दर जैसे थे आहे. बाधितांचे प्रमाणही 22 ऑगस्टच्या तुलनेत वाढला असून तो गडहिंग्लजचा 10.47, चंदगडचा 11, तर आजऱ्याचा 14.26 टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. 

यावरून स्थानिक संसर्गाचा वेग लक्षात येतो. प्रशासनाकडून कितीही जनजागृती केली तरी नागरिकांतून प्रतिसाद मिळण्यात अजूनही कासवगतीच आहे. शासनातर्फे आता गावागावात "माझे कुटूंब माझी जबाबदारी' ही मोहिम राबवणार आहे. या मोहिमेतून घर टू घर सर्व्हेचे काम सुरू केले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यावर हा पर्याय शोधला असला तरी नागरिकांनी तपासणी करणाऱ्या यंत्रणेला खरी माहिती देण्याची गरज आहे. खोटी माहिती दिल्यास या सर्व्हेचाही उपयोग होणार नाही. प्रशासन जनतेची काळजी घेत आहे, मात्र आता वेळ आहे त्यांना साथ देण्याची. नागरिकांनी याचा गांभीर्याने विचार करायला हवा. 

गडहिंग्लज उपविभागातील कोरोना आलेख 

22 ऑगस्ट 
- एकूण स्वॅब व अँटीजेन तपासणी : 13554 
- एकूण बाधित : 1200, टक्केवारी 8.85 
11 सप्टेंबर 
- एकूण स्वॅब व अँटीजेन तपासणी : 17742 
- एकूण बाधित : 2043, टक्केवारी : 11.51 


20 दिवसांतील स्थिती 
- स्वॅब व अँटीजेन एकूण तपासणी : 4188 
- आढळलेले बाधित : 843 
 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com