

Urban Development Projects
sakal
कोल्हापूर : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात विकासकामांपेक्षा ‘टक्केवारी’ हाच केंद्रबिंदू ठरत असल्याची चर्चा आता गुप्त न राहता उघडपणे होऊ लागली आहे. रस्ते असोत, तलावांचे सुशोभीकरण, चौकांवरील आयलँड, शासकीय इमारत बांधकाम किंवा पाणीपुरवठा योजना या प्रत्येक कामांमागे गुणवत्तेऐवजी किती टक्के ‘सेटल’ झाले, याचाच हिशेब अधिक महत्त्वाचा ठरत असल्याची धक्कादायक स्थिती आहे.