
Sangli Crime News : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच कुपवाडमधील गर्भवती नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. या नवविवाहितेवर धार्मिक दबाव टाकत पतीसह सासू, सासऱ्यांनी शारीरिक व मानसिक छळ करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा आज कुपवाड पोलिसांत नोंद झाला.