
Kolhapur Police : पोळगाव (ता. आजरा) येथील एकाने पुलावरून चित्री नदीच्या प्रवाहात उडी मारली. गुणाजी गोविंद खामकर (वय ४९, रा. पोळगाव) असे त्यांचे नाव आहे. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास पत्नी व भाच्यासमोर हा प्रकार घडला. नदीचा प्रवाह वेगवान असल्याने ते वाहून गेले. आजरा पोलिसांकडून तातडीने शोध मोहीम राबविण्यात आली आहे.