Armed Thieves Attempt Robberies at Two Locations in Pethwadgaon as CCTV Footage Captures the Incidents
sakal
पेठवडगाव : येथील शिवाजी पेठ आणि चांदोली वसाहत परिसरात शनिवारी मध्यरात्री शस्त्रधारी चोरांनी धुमाकूळ घालत दोन ठिकाणी दरोड्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे व जागरूकतेमुळे चोरांचे मनसुबे उधळले गेले. चड्डी-बनियन आणि तोंडाला टावेल बांधलेल्या चार शस्त्रधारी चोरांच्या या टोळीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांच्या ढिसाळ गस्तीवर तीव्र संताप व्यक्त होत आहे.