Miraj Road Accident : वडगाव-हातकणंगले रस्त्यावर दुचाकी-कारचा भीषण अपघात! सांगलीतील बँक शाखा व्यवस्थापक जागीच ठार; पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत

Pethwadgaon–Hatkanangale Road Accident : मिणचेजवळ भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक दीपक शिंदे यांचा मृत्यू झाला. पत्नी आशादेवी गंभीर जखमी झाल्या.
Pethwadgaon Hatkanangale road accident HDFC bank manager death

Pethwadgaon Hatkanangale road accident HDFC bank manager death

esakal

Updated on: 

पेठवडगाव : वडगाव-हातकणंगले रस्त्यावर मिणचेजवळ भरधाव मोटारीने समोरून येणाऱ्या दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जागीच ठार (Miraj Road Accident Near Pethwadgaon) झाले. दीपक रावसाहेब शिंदे (वय ४२, रा. दत्त मंदिराजवळ, भरतनगर, मिरज) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांची पत्नी आशादेवी शिंदे (३७) या अपघातात गंभीर जखमी झाल्या. हा अपघात सोमवारी (ता. २८) सकाळी आठच्या सुमारास घडला. शिंदे हे सांगली येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेत व्यवस्थापक होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com