
पेठवडगाव: येथील सरकारी दवाखाना कृती समितीच्या वतीने नगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये सर्व सुविधा मिळाव्या या मागणीसाठी अनोखे आंदोलन करून पालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला. विजय अपराध यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या मागण्यांची दखल न घेतल्यास 15 ऑगस्ट ला पुन्हा नगरपालिका चौकात आंदोलन करण्याचा इशारा या समितीने दिला आहे.