esakal | कोल्हापुरात पेट्रोल दराची शंभरी पार
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापुरात पेट्रोल दराची शंभरी पार

कोल्हापुरात पेट्रोल दराची शंभरी पार

sakal_logo
By
लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात एक लिटर पेट्रोलने आज शंभरी पार केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज पेट्रोलचा दर प्रति मीटर शंभर रुपये 14 पैसे झाला आहे. तर प्रीमियम पेट्रोलचा दर 105 रुपये प्रति लिटर झाला आहे. गेली तीन-चार दिवस 45, 65, 88 असे प्रत्येक लिटरला पैसे वाढत गेले आणि आज चक्क शंभर रुपये 14 पैशांनी एक लिटर साधे पेट्रोल ग्राहकांना खरेदी करावे लागले. तर प्रिमीयम पेट्रोल एकशे पाच पैशांना प्रति लिटर झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने लागू केलेल्या कराचाही दरवाढी मध्ये मोठा वाटा आहे.

सध्या कोरोना महामारी सुरू असतानाही पेट्रोलचे दर वाढतच आहेत. त्यामुळे वाहनधारकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. सध्या कोल्हापूर जिल्हा पेट्रोल डीलर असोसिएशनकडे आलेला आजचा दर हा प्रति लिटर 99 रुपये 88 पैसे आहे. तरीही कोल्हापुरातील पेट्रोल पंपावर शंभर रुपये 14 पैसे मीटर पडत आहे. तितकीच रक्कम पेट्रोल पंप कर्मचारी घेत आहेत. याबाबत कोल्हापूर जिल्हा पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष गजकुमार माणगावे यांनी सांगितले, की मिरज हा डेपो आहे. तेथे पेट्रोलचा प्रतिलिटर दर 99 रुपये 88 पैसे आहे. प्रत्यक्षात कोल्हापूर पर्यंत हे पेट्रोल पोहोचण्यासाठी वाहतूक खर्च वाढतो. त्यामुळे काही पैशांची वाढ या दरात होते. त्यामुळे कोल्हापुरात शंभर रुपये 14 पैसे लिटर साधे पेट्रोल मिळणे स्वाभाविक आहे.

हेही वाचा: कोकणातून आंब्यांची भेट; सुप्रिया सुळेंनी केलं कौतुक

पेट्रोल दर वाढत गेल्याचा तपशील असा

23 मे 2021 -

पेट्रोल दर 99 = 43, प्रिमियम पेट्रोल दर 102 = 81 व डिझेलचा दर 89 = 92 पेट्रोल व प्रिमियम पेट्रोल दरात प्रत्येकी 17 पैशांची वाढ झालेली आहे. डिझेल दरात 28 पैशांची वाढ झालेली आहे.

25 मे 2021

पेट्रोल दर 99 = 65, प्रिमियम पेट्रोल दर 103 = 03 व डिझेलचा दर 90 = 17 पेट्रोल व प्रिमियम पेट्रोल दरात प्रत्येकी 22 पैशांची वाढ झालेली आहे. डिझेल दरात 25 पैशांची वाढ झालेली आहे.

27 मे 2021

पेट्रोल दर 99 = 88, प्रिमियम पेट्रोल दर 103 = 26 व डिझेलचा दर 90 = 47 पेट्रोल व प्रिमियम पेट्रोल दरात प्रत्येकी 23 पैशांची वाढ झालेली आहे. डिझेल दरात 30 पैशांची वाढ झालेली आहे.