तांदूळ साधा, वास बासमतीचा ; कृत्रिम वासाचा द्रव लावून ग्राहकांची लूट

तांदळाला कृत्रिम वास किंवा वासाचा द्रव लावून तो ‘बासमती’ तांदूळ असल्याचे भासवून ग्राहकांची लूट केली जात असल्याचा प्रकार
Plain rice smells of basmati fraud with customers injecting artificial odors kolhapur
Plain rice smells of basmati fraud with customers injecting artificial odors kolhapur sakal

कोल्हापूर : तांदळाला कृत्रिम वास किंवा वासाचा द्रव लावून तो ‘बासमती’ तांदूळ असल्याचे भासवून ग्राहकांची लूट केली जात असल्याचा प्रकार पुढे येत आहे.  वासाच्या अपेक्षेने ग्राहक १६ ते १८ रुपये किलोचा कणी तांदूळ  ३५ ते ४० रुपयांनी खरेदी करतात.  दुसरीकडे  बासमती पिकणाऱ्या राज्यात लांबलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून, पुरवठा कमी झाला आहे. वाढती मागणी आणि अपुऱ्या पुरवठ्यामुळे बासमतीच्या दरात  क्विंटलला  ३००  ते ६००  रुपयांची वाढ झाली आहे. 

राईस मिलमध्ये पडलेली कणी आजबाजूच्या आणि गुजरातच्या मार्केटमधून येते. हीच कणी पॉलिश करून वास यावा म्हणून ‘व्हंड परिमल’ नावाचं सुवासिक अत्तर लावले जाते. किंवा तांदळात काही वनस्पतीची पाने ठेवली जातात. ही पाने किमान १२ तास राहिल्यास तांदळाला वास येतो. असा तांदूळ पुढे वेगवेगळ्या ब्रँडच्या बॅगमध्ये भरून ‘बासमती’ म्हणून विकला जातो. ‘तुकडा बासमती’ या गोंडस नावाने ही विक्री केली जाते. दुकानात पोते खोलले तरी दरवळणारा वास काही दिवसांतच उडून जातो आणि दुकानदारांना मात्र ग्राहकांच्या तक्रारीला सामोरे जावे लागते. पंजाब, हरियाना आणि उत्तर प्रदेशात बासमतीची लागवड होते.

दोन वर्षांत परतीच्या पावसाने भात पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत घट झाली. सध्या किरकोळ बाजारात लोकांना बासमती तांदूळ ६० ते ११० रुपये किलोने मिळत आहे. बासमती इतर तांदळापेक्षा जास्त खाल्ला जाणारा तांदूळ आहे, बासमती तांदळाचा भाव वाढला, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या बाजारात बासमती स्टीम आणि पॉलिश अशा तांदूळ बाजारात येतो. बासमती तांदूळ लग्न समारंभ, हॉटेल आणि बिर्याणीसाठी वापरला जायचा. काही वर्षांत घरगुती वापर वाढल्याने या तांदळाची मागणी वाढली आहे.

सध्या बासमतीला मागणी अधिक आहे. घरगुती वापर आणि लग्नसराईमुळे मागणी वाढते, पण अनेक मिल बंद पडल्याने पुरवठ्यात घट होत आहे. वासाचा द्रव लावून बासमती तांदूळ येतो. हा प्रकार चुकीचा आहे.

- नयन प्रसादे, धान्य व्यापारी

दुकानातून घरात आणेपर्यंत तांदळाला वास राहतो. मात्र, काही दिवसांत हा वास राहत नाही. त्यामुळे चव बदलते. तीन-चार रुपये दर वाढल्याने बजेटसोबत चवीतही फरक पडल्याने तक्रार कोणाकडे करायची?

- दिलीप रणनवरे, नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com