कोल्हापूर : निवडून आणायचे कोणाला, याचे नियोजन; सोयीच्या राजकारणावर डोळा

दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांत मात्र खदखद
KDCC Bank Election
KDCC Bank ElectionSakal

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या(kolhapur district bank) निवडणुकीत(election) कोणाचा पराभव करायचा यापेक्षा दोन्ही पॅनेलमधून निवडून कोणाला आणावे, याचे नियोजन जोरात सुरू आहे. जागा वाटपावरून निर्माण झालेला तणाव आणि त्यातून दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांत असलेली खदखद याचे प्रतिबिंब निवडणुकीत उमटण्याची चिन्हे असून राजकारणात सोयीचा कोण, याचा आराखडा बांधूनच नियोजन सुरू आहे.अखेरच्या क्षणी समाधानकारक जागा न मिळाल्याने स्वतंत्र पॅनेल शिवसेनेने(shivsena) रिंगणात उतरवले.

यामुळे राज्यातील महाविकास आघाडीत(mahavikas aghadi) जिल्हा बँकेत मात्र बिघाडी झाली; पण दुसरीकडे भाजप मात्र सत्ताधाऱ्यांसोबत राहिले. यात इच्छा असूनही सत्तारूढ गटात उमेदवारी न मिळालेले, पण भविष्याच्या राजकारणात(politics) सोबत असणाऱ्या विरोधी पॅनेलमधील काहींना यात विजयी करण्याची मोहीम सुरू झाल्याचे प्रचारावरून दिसत आहे. यात वडगांव बाजार समितीच्या निवडणुकीत नव्याने उदयास आलेल्या आघाडीकडून शिरोळ, हातकणंगले व शाहूवाडी, पन्हाळ्यातील मते फिरवण्याची ताकद आहे. ही ताकद राखीव गटात पाहायला मिळेल.

KDCC Bank Election
''कोल्हापुरकरांनो तुम्ही समाजावर चांगुलपणाचा संस्कार केलात''

नेत्यांनी आपल्या जागा सुरक्षित करून घेतल्या असल्या तरी जे कार्यकर्ते म्हणून रिंगणात आहेत त्यांच्यासमोर मात्र अडचणीचा डोंगर पहायला मिळत आहे. खासदार प्रा. संजय मंडलिक, माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे, संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, अनिल पाटील हे पाच वर्षे सत्ताधाऱ्यांसोबत एकनिष्ठ राहिले; पण जागा वाटपात त्यांना सत्तारूढ गटाकडून संधी मिळाली नाही. तथापि हे सर्वजण गेल्या २० ते २५ वर्षांपासून नेत्यांशी एकनिष्ठ आहेत, त्यातून या सर्वांचा सत्तारूढ गटातील अनेक नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. या संबंधांचे पडसादही निकालात उमटतील अशी व्यवस्था आखली जात आहे.

KDCC Bank Election
अटक करून काय पराक्रम केलात..?; पाहा व्हिडिओ

जिल्हा बँकेच्या २१ जागांपैकी ६ जागा बिनिविरोध झाल्या. उर्वरित १५ जागांसाठी ३३ जण रिंगणात आहेत. त्यात शिरोळ, गडहिंग्लज, शाहूवाडी, आजरा तालुका विकास संस्था गटात ‘काँटे की टक्कर’ आहे. याच गटातील भुदरगड, पन्हाळा तालुक्यात फक्त निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही म्हणून काहींचे अर्ज आहेत; पण राखीव गटात मात्र कोण विजयी होईल हे सांगता येत नाही. विधानसभेच्या निकालानंतर जिल्हा बँकेत झालेल्या सत्कार समारंभात विधानसभेच्या निवडणुकीत बँकेच्या संचालकांना विजयी करण्याचे आमचे ठरले होते, असा गौप्यस्फोट प्रा. मंडलिक यांनी केला होता. या निवडणुकीत शिवसेनेचे पाच विद्यमान आमदार पराभूत झाले होते.

आज हे सर्व माजी आमदार प्रा. मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील सेनेच्या पॅनेलसोबत आहेत. त्याचेही पडसाद यात उमटण्याची शक्यता आहे.बँकेनंतर लगेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक आहे. यापूर्वी या निवडणुकीत अनेक कुटुंबांची वाताहत झाली आहे. काही कुटुंबांतील खुनासारख्या गुन्ह्यात कारागृहात आहेत. यातील बहुंताशी कार्यकर्ते दुसऱ्या फळीतील आहेत, ज्यांना बँकेच्या निवडणुकीत डावलले. मग अशा स्थितीत तालुका पातळीवर आता एकत्र असलेल्यांच्या विरोधातच त्यावेळी उमेदवारी द्यावी लागणार आहे, त्यावेळी कार्यकर्त्यांनी कोणाचा म्हणून रिंगणात उतरायचे याचाही विचार करण्याची वेळ आली आहे.

KDCC Bank Election
चिपळूण : खासदार साहेब, उशीर केलात; उपोषणकर्त्यांनी ठणकावले

आरोपही सांभाळूनच

बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सत्तारूढ गटाचा प्रचार प्रारंभ शनिवारी गडहिंग्लजमध्ये झाला. त्यात वैयक्तिक टीका टाळून पक्षीय पातळीवरही सावधपणे टीका करण्यात आली. अशीच स्थिती विरोधी आघाडीच्या आज झालेल्या प्रचार सभेत पाहायला मिळाली. विरोध आक्रमक असले तरी त्यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर होत असलेली सौम्य टीका यावरूनच भविष्यात काय होतेय,याची झलक पाहायला मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com