देशासाठी अशीही सलामी : सिद्धनेर्लीत 750 वृक्षांचे रोपण

सामाजिक बांधिलकी आजीची व चिमुकलीची
sidhnerli planting
sidhnerli planting

सिद्धनेर्ली (कोल्हापूर) : अमृत महोत्सवी भारतीय स्वातंत्र्य दिनी येथे ७५० वृक्षांचे रोपण करून पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला. निसर्ग व पर्यावरण संघटनेच्या पुढाकाराने सिनेअभिनेते व सह्याद्री देवराईचे शिल्पकार सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून एक सलामी देशासाठी एक सलामी वृक्षासाठी हा अभिनव उपक्रम राबविला.

निसर्ग व पर्यावरण संघटनेने यापुर्वी शिवराज्याभिषेक दिन, पर्यावरण दिनी वृक्षांची लागवड करून संगोपन करत आहेत. तशाच प्रकारे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थांना आवाहन केले होते. ध्वजारोहणासाठी कोरोना मुळे एकत्र येतात येत नाही म्हणून प्रत्येकाने आपल्या घराच्या शेताच्या मोकळ्या जागेत अथवा बांधावर प्रत्येक कुटुंबाने किमान एक वृक्ष रोपण करून देशसेवा करावी व एक सलामी देशासाठी, एक सलामी वृक्षासाठी ह्या उपक्रमात सहभागी होऊन आपला झाडा सोबतचा एक फोटो व वृक्ष रोपण केलेली संख्या संघटने पर्यंत पोहचविण्याचे आवाहन करण्यात आले होते. ग्रामस्थांच्या सोईसाठी सिध्देश्वर मंदिर परिसरात माफक दरात वृक्ष स्टॉल उपलब्ध करून दिला. त्याला प्रतीसाद देत सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत वृक्षारोपण केले.

यामध्ये हनुमान तालीम मंडळासह सर्व तरूण मंडळे, सिध्दनेर्ली विद्यालय, प्रियदर्शिनी इंदिरा हायस्कूल, पंचलक्ष्मी इंग्लिश मिडियम स्कुल, गणेश आर्मी स्कुल, कुमार व कन्या विद्या मंदिरच्या सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संचालक मंडळ, पशुवैद्यकीय दवाखाना, सिध्देश्वर दुध संस्था,आजी-माजी सैनिक संघटना, संत निरंकारी मंडळ आदी उत्सफुर्तपणे सहभागी झाले. ज्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही त्यांनी सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करून संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. या वृक्षारोपण केलेल्या सर्वांना सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले.

sidhnerli planting
ह्रदयद्रावक! जन्मदातीने गळफास घेतलेला पाहून 'त्यांनी' फोडला हंबरडा

या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्य वन्यजीव महामंडळ सदस्य सुहास वायंगणकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या उपक्रमासाठी निसर्ग व पर्यावरण संघटनेचे अध्यक्ष मधुकर येवलुजे, कॉ. शिवाजीराव मगदूम, विवेक पोतदार, संदीप गुरव, धनाजी पोवार, संदीप मगदूम, तेजस पाटील, संजय पोवार , लक्ष्मण गुरव, डॉ. रघुनाथ मगदूम, उमाजी पोवार, श्रीकांत पाटील, सतिश निकम यांनी विशेष परिश्रम घेतले.

सामाजिक बांधिलकी आजीची व चिमुकलीची

४थी मध्ये शिकणाऱ्या कु. कादंबरी अजित घराळ हिने १४ऑगस्ट रोजी दवाखान्यातून घरी परत आल्यावर दि १५रोजी वृक्षारोपण करून सहभाग घेऊन सिध्दनेर्लीकरांना वृक्षारोपणाचे आवाहन केले. तर श्रीमती सरस्वती येवलुजे यांनी ७५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुस्लिम दफनभूमी येथे वृक्षारोपण करून संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. रोहिदास माने यांनी याच दिवशी एका वास्तुशांती समारंभात वृक्ष भेट दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com