
सुनील पाटील
कोल्हापूर : गोरगरिबांना हक्काचा निवारा मिळावा, त्यांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. जिल्ह्यात घरकुल योजनेसाठी पहिला हप्त्याचे वाटप केले. ३५ हजार लोकांनी घर बांधणीचा अजूनही विचार केलेला दिसत नसताना अनुदान मिळालेल्या लाभार्थांकडून मात्र प्रत्येकी पाच हजारांची ‘खुशाली’ उकळण्याचे काम काही अधिकाऱ्यांकडून केले जात असल्याचे धक्कादायक चित्र आहे.