
प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेचा एक रुपयाचा फायदा नाही
esakal
कोल्हापूर जिल्ह्यातील ५.९१ लाख खातेदारांच्या खात्यातून दरवर्षी ₹४३६ कपात होऊन सुमारे ₹२५.८० कोटी प्रीमियम जमा केला जातो, मात्र लाभार्थ्यांची आकडेवारी अस्पष्ट आहे.
फक्त ११ लाभार्थ्यांना आतापर्यंत विमा रक्कम मिळाल्याचे स्पष्ट झाले असून, क्लेम प्रक्रियेबाबत जागरूकतेचा अभाव मोठ्या प्रमाणात दिसतो.
पारदर्शकतेचा व माहितीचा अभाव ही या योजनेतील मुख्य अडचण असून, प्रशासनाने आकडेवारी सार्वजनिक करून मोफत जनजागृती शिबिरे आयोजित करावीत, अशी मागणी वाढली आहे.
PM Jeevan Suraksha Bima Yojana : कोल्हापूर जिल्ह्यातील पाच लाख ९१ हजार १९० खातेदारांचे प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेंतर्गत वर्षाला प्रत्येकी ४३६ रुपये कपात करून घेतले जातात. ही योजना विमाधारकासाठी चांगली असली तरीही पैसे कपात झाल्यानंतर किंवा एखाद्या पात्र लाभार्थ्याने या योजनेतून लाभ कसा घ्यावा, याची माहितीच नाही. त्यामुळे वर्षाला केवळ पैसे कपात होतात; पण लाभ किती जणांना मिळाला, हा प्रश्न आहे.