PM Kisan 2026 Kolhapur farmers e-KYC Aadhaar bank linking
esakal
कुडित्रे (जि. कोल्हापूर) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा नियमित हप्ता मिळविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी शासनाने विशेष मोहीम हाती घेतली (PM Kisan 2026 Update) आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार २ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जात आहे. या मुदतीत ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी, बँक खात्याशी आधार संलग्न करणे आणि भूमी अभिलेख नोंद पूर्ण होणार नाही, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.