
कुंडलिक पाटील
कुडित्रे : शेतकऱ्यांतून ॲग्री स्टॅक (फार्मर आयडी) काढण्यात दिरंगाई होत असल्यामुळे पीएम किसान योजनेच्या लाभाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) अनिवार्य आहे. परिणामी पीएम किसानचा लाभ घेणाऱ्या जिल्ह्यातील एक लाख ८ हजार शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला नाही. फार्मर आयडी नसेल तर पीएम किसान योजनेचा येणारा विसावा हप्ता एक लाख आठ हजार लाभार्थ्यांना मिळणार नसल्याची माहिती कृषी खात्याकडून देण्यात आली आहे.