esakal | कोल्हापुरात बिअरबार, हॉटेल व्यावसायिकांवर पोलिसांची धडक कारवाई

बोलून बातमी शोधा

कोल्हापुरात बिअरबार, हॉटेल व्यावसायिकांवर पोलिसांची धडक कारवाई
कोल्हापुरात बिअरबार, हॉटेल व्यावसायिकांवर पोलिसांची धडक कारवाई
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरामध्ये 11 नंतर दुकाने सुरु ठेवणाऱ्या 2 बिअरबार, 5 हॉटेल व्यवसायिक व इलेक्‍ट्रीकचे गोडावूनधारकांवर दंडात्मक कारवाई करुन 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे शहरामध्ये विनामास्क, सोशल डिस्टन्सचे पालन न केल्याने 49 नागरीक व व्यापाऱ्यांकडून 76 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

शहरामध्ये शासनाच्या आदेशानुसार 11 नंतर औषधे दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येत आहेत. बुधवारी(ता. 21) एप्रिल मिरजकर तिकटी येथील रविराज बिअरबार, संभाजीनगर येथील इंदिरासागर बिअरबार यांना प्रत्येकी 5 हजार रुपये तर पितळी गणपती येथील 3 हॉटेलवर प्रत्येकी 1 हजार रुपये असे एकूण 15 हजार रुपयांचा दंड करण्यात आला. त्याचप्रमाणे आज पद्मा टॉकीज जवळील आर के लाईट हाऊस यांनी गोडावून चालू ठेवून गोडावूनमधून इलेक्‍ट्रीक मॉल विकल्याबद्दल त्यांच्याकडून 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस पथकाकडून 149 लोकांकडून 76 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापरने, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक गोष्टींचा भंग केल्याबददल बुधवारी(ता. 21) विनामास्क 146 लोकांनकडून 73000, सोशल डिस्टन्सचे पालन न केल्याने 3 नागरीकांकडून 3000 असे एकुन 76 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

हेही वाचा- कनाननगर झोपडपट्टीत अँटिजनमध्ये 8 पॉझिटिव्ह; महापालिकेची धडक मोहीम

शहरामध्ये गर्दी वाढत असलेने नागरीकांनी दक्षता घेणे आवश्‍यक आहे. सन, समारंभ, धार्मिक स्थळे, भाजी मार्केट याठिकाणी नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा, सॅनिटाईजरचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे असे आवाहन महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

Edited By- Archana Banage