
Kolhapur Crime : मालकाच्या मित्रांची रक्कम वेगवेगळ्या वाहनांतून दररोज येताना पाहून कामगाराच्या मनात चोरीचा विचार आला. सख्ख्या भावासह चार मित्रांना घेऊन महिन्यांपासून पाळत ठेवून गुडलक स्टेशनरीतील कामगार स्वरूप संजय शेळके (वय २५, रा. लक्षतीर्थ वसाहत) याने तब्बल एक कोटी ९० लाखांच्या रकमेवर डल्ला मारल्याचे समोर आले आहे.
गांधीनगर येथे १३ जूनच्या मध्यरात्री टेम्पोची काच फोडून झालेल्या लुटीचा उलगडा करत पोलिसांनी पाच जणांच्या टोळीला जेरबंद केले. चोरीतील एक कोटी ७८ लाखांची रक्कम जप्त करण्यात आली. पकडण्यात आलेल्यांमध्ये एका अल्पवयीनाचाही समावेश असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.