ब्रेकिंग:  चक्काजाम आंदोलनात माजी खासदार राजू शेट्टी  यांच्यासह समन्वय समितीच्या नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Police arrested  former MP  Raju Shetty  and leaders of the coordination committee during the Chakka Jam agitation farm act agriculture news
Police arrested former MP Raju Shetty and leaders of the coordination committee during the Chakka Jam agitation farm act agriculture news

कोल्हापूर : शेतकरी विरोधात केलेले कायदे केंद्र सरकारने मागे घ्यावेत या मागणीसाठी दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन सुरू आहे. या  आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी  अखिल भारतीय किसान समन्वय समितीतर्फे दाभोळकर कॉर्नर येथील चक्काजाम आंदोलन करण्यात आले.  किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे जिल्ह्यातील नेते, शेतकरी, शेतमजूर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत. 

चक्काजाम केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच प्रमुख नेत्यांना पोलिसांनी गाडीत बसवले. यावेळी पोलीस, नेते आणि कार्यकर्ते यांमध्ये जोरदार झटापट झाली यावेळी राजू शेट्टी सतीशचंद्र कांबळे, चंद्रकांत यादव, दिलीप पवार, रघुनाथ कांबळे, गिरीश फोंडे प्रशांत आंबी, गिरीश कांबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सविस्तर वृत्त थोड्याच  वेळात\

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com