आमच्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी, कोरोनाच्या 'बंदोबस्तासाठी' पोलीसांचा खडा पहारा

police
policeSakal Media
Updated on
Summary

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोलिस यंत्रणा डोळ्यांत तेल घालून काम करत आहे.

कोल्हापूर : ‘‘नाकावर मास्क का नाही लावला?’’ करवीर पोलिस (Police) ठाण्याच्या पोलिस नाईक सुप्रिया आपटे-भोई यांनी तरुणाला प्रश्न केला. ‘‘मास्क लावला होता. गडबडीत काढून खिशात ठेवला.’’ तरुणाने स्पष्टीकरण दिले. ‘‘मास्क न लावल्याचा दंड भरा,’’ महापालिकेचा कर्मचारी बोलला. ‘‘का? सरकारला काय भीक लागली आहे का?’’ तरुण म्हणाला. (Police have to work day and night to stop corona)

‘‘तुमच्या सुरक्षिततेसाठीच चाललंय हे सगळं,’’ आपटे यांनी सूर आळवला. ‘‘दंड का भरायचा? पैसे नाहीत माझ्याकडे,’’ तरुणाचा आवाज चढला. आपटे यांनी त्याला सांगण्याचा प्रयत्न केला. ‘‘तुम्हाला माहीत नाही मी कोण आहे? लावू का फोन आमच्या सायबाला?’’ तरुण ऐकत नव्हता. कुटुंबीयांच्या काळजीचं ओझं वाहताना नागरिक स्वत:ची काळजी का घेत नाहीत, असा प्रश्न त्यांना सतावतो.

police
‘कारभारी हो... जनतेला सावरा; कोरोनाच्या कहरात तरुणाईची साद

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोलिस यंत्रणा डोळ्यांत तेल घालून काम करत आहे. आपटे-भोई बंदोबस्तात कार्यरत असून त्यांचे माहेर पुणे आहे. कोल्हापुरातल्या राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयाच्या त्या विद्यार्थिनी आहेत. महाविद्यालयाकडून त्या विविध ठिकाणी कबड्डी स्पर्धा खेळल्या आहेत. राष्ट्रीय कबड्डी खेळाडू म्हणून त्यांनी स्पर्धा गाजवल्या. २००४ ला त्या मुंबईत पोलिस भरती झाल्या. त्यांची २०१३ ला राजारामपुरी पोलिस ठाण्यात बदली झाली. सध्या त्या करवीर पोलिस ठाण्यात सेवा बजावत आहेत. वर्षभर कधी पोलिस ठाण्यात तर कधी थेट नाकाबंदीच्या बंदोबस्तात त्या आहेत. राहायला त्या जिवबा नाना पार्क येथे असून, पती, सासू व अकरा वर्षांचा मुलगा अथर्व असं त्यांचं कुटुंब आहे. वर्षभर त्या आईला भेटायला पुण्याला गेलेल्या नाहीत.

‘‘ड्यूटीवर सेवा बजावताना एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आला. ड्यूटीवरील सर्वांचे स्वॅब तपासले. सुदैवाने माझा स्वॅब निगेटिव्ह आला. स्वॅब पॉझिटिव्ह आला असता तर दहा दिवस कुटुंबीयांपासून दूर कसे राहायचे, हा विचार अस्वस्थ करतो. सकाळी ड्यूटीवर लवकर यायचे, रात्री वेळाने जायचे. घरी गेल्यावर सॅनिटाईज व्हायचे. आंघोळ करायची आणि मगच घरात प्रवेश करायचा, हे रोजचेच झाले आहे. काही नागरिक पोलिसांशी हुज्जत घालतात. पोलिस त्यांच्या हितासाठी काम करत आहेत, हेच ते विसरले आहेत,’’ आपटे-भोई सांगत होत्या.

(Police have to work day and night to stop corona)

police
कोल्हापूर-तिरूपती एक्सप्रेस 31 मे पर्यंत रद्द

दोन वेळा कोरोना पॉझिटिव्ह आलेले लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांच्याशी संवाद साधला. कोरोनातून बरे होऊन ते कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर कोरोना रुग्णांसाठी सीपीआरमध्ये कोविड सेंटर तयार झाले. ‘‘सीपीआर लक्ष्मीपुरी ठाण्याच्या हद्दीत येते. तिथल्या बंदोबस्ताचा ताण होता. येणाऱ्या नागरिकांची माहिती संगणकावर भरणे, त्यांची रांग लावणे, या कामात पोलिस कर्मचारी होते.

केवळ मास्क व फेसशिल्ड लावून त्यांना हे काम करावे लागायचे. पीपीई किट घालून ते करणे शक्य नाही. पॉझिटिव्ह रुग्णाला क्वारंटाईन करण्याची जबाबदारी पोलिसांवर होती. एखादा पॉझिटिव्ह रुग्ण पळून जाऊ नये, यासाठी त्यांना डोळ्यांत तेल घालून पहारा द्यावा लागायचा. घरी जाताना मात्र चिंता अधिक वाढायची. माझ्यासह पत्नी व मुलगा पॉझिटिव्ह होतो. आम्ही सारे वेळेत उपचार घेऊन बरे झालो. नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलिसांवरील ताण थोडा कमी होईल,’’ गुजर यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना सोसाव्या लागणाऱ्या हाल अपेष्टा सांगितल्या.

३६० जणांना कोरोनाची लागण

कोल्हापूर जिल्ह्यात एकूण १५९ पोलिस अधिकारी असून, पोलिस कर्मचारी २७६० आहेत. प्रत्येक जण नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, याकरिता राबत आहे. ड्यूटीवर तत्पर असताना ३६० जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com