Kolhapur News : . जिल्ह्यातील २७ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; सायबर, शाहूवाडी व नियंत्रण कक्षात नियुक्त्या

Shahuwadi police : सायबर विभाग, शाहूवाडी आणि नियंत्रण कक्षात नवीन नियुक्त्या करण्यात आल्याने प्रशासनाच्या कामकाजात गती येण्याची अपेक्षा आहे.
police appointment

police appointment

sakal

Updated on

कोल्हापूर : सायबर पोलिस ठाणे, विमानतळसह जिल्ह्यातील प्रमुख पोलिस ठाण्यांमध्ये नूतन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या. शाहूवाडी, राधानगरी, गोकुळ शिरगाव, शहापूर, चंदगड, शिवाजीनगर पोलिस ठाण्यांत खांदेपालट करण्यात आले. १२ पोलिस निरीक्षक, १४ सहायक निरीक्षक व एका महिला उपनिरीक्षकाचा बदल्यांमध्ये समावेश आहे. बदलीविरोधात न्यायालयात गेलेले रवींद्र कळमकर यांची नियुक्ती पोलिस नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com