Kolhapur Crime: काेल्हापुरातील पाडळकर मार्केटसमोरील व्हिडिओ पार्लरवर छापा; माजी नगरसेवकावर गुन्हा, साडेचार लाखांची एकवीस मशीन ताब्यात

21 gaming machines worth 4.5 lakh seized in police raid: व्हिडिओ गेम पार्लरच्या नावाखाली अवैध जुगार; पोलिसांचा छापा, २१ मशीन जप्त, माजी नगरसेवकासह सहा जणांवर गुन्हा
Kolhapur Crackdown: Former Corporator Booked After Raid on Video Parlour

Kolhapur Crackdown: Former Corporator Booked After Raid on Video Parlour

sakal

Updated on

कोल्हापूर: गंगावेश ते रंकाळा स्टॅंन्ड मार्गावरील व्हिडिओ गेम पार्लरवर जुना राजवाडा पोलिसांनी छापा टाकला. पार्लर चालकासह खेळण्यासाठी आलेल्या पाच जणांना ताब्यात घेतले. २१ व्हिडिओ गेम्स मशीन, डीव्हीआर, नोंदणी रजिस्टर, रोख रक्कम असा सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. एक रुपयाला आठ रुपये देण्याचे आमिष दाखवून जुगार चालविला जात असल्याने ही कारवाई केल्याचे पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी सांगितले. माजी नगरसेवक अजिंक्य शिवाजीराव चव्हाण (रा. शिवाजी पेठ) यांच्या मालकीचे पार्लर असल्याने समोर आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com