कौशल्याला वर्दीची संधी पोलिस भरतीत राखीव जागा; | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police

कौशल्याला वर्दीची संधी पोलिस भरतीत राखीव जागा;

कोल्हापूर : फिटनेस, बुद्धिमत्तेबरोबर विविध क्रीडा प्रकारांत चमक दाखविणाऱ्या खेळाडूंना वर्दीची संधी मिळते. आर्थिक स्थैर्यासह सन्मानही मिळतो. ही वर्दी मिळविण्यासाठी खेळाडूंच्याच चढाओढ लागते. क्रीडा प्रकार कोणताही असो त्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यालाच ही वर्दी मिळते. मोजकाच कोटा असला तरी हजारोंच्या संख्यने खेळाडू भरतीत उतरतात.

मुलांनी डॉक्टर, इंजिनिअरच बनावे, अशी पालकांची मानसिकता बदललेली आहे. मुलाने स्टार खेळाडू बनावे. मैदाने गाजवावीत. त्यातून मुलाला चांगली सन्मानजनक नोकरी मिळावी, अशी इच्छाही पालक बाळगत आहेत. आज शालेय वयातच मुलांचे क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिस भरतीत खेळाडूंसाठी पाच टक्के राखीव कोटा आहे. मर्यादित जागेसाठी हजारो खेळाडू भरती प्रक्रियेत उतरतात. फिटनेस, बुद्धिमत्तेबरोबर खेळात सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडूच वर्दीचा हकदार ठरतो. भरतीसाठी सर्व क्रीडा प्रकार उपलब्ध आहेत. भरती प्रक्रियेत निवड व्हावी, यासाठी खेळाडू मैदानावर सराव करताना दिसतात. त्यांचा जिल्हा, राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांत यश प्राप्त करून बायोडेटा भक्कम करण्याचा प्रयत्न असतो.

पोलिस भरती झालेल्या खेळाडूला एक वर्षे नाशिक, जालना येथे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर त्यांची शक्यतो मुख्यालयातच नेमणूक केली जाते. या खेळाडूंना पोलिस क्रीडा विभागामार्फत प्रशिक्षण आणि सरावाची संधी उपलब्ध करून दिली जाते. पोलिस दलाच्या परिक्षेत्रीय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. ऑल इंडिया स्पर्धेतील महाराष्ट्राच्या संघात जिल्हा पोलिस दलातील २१ खेळाडू प्रतिनिधित्व करत आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, गृह पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, राखीव पोलिस निरीक्षक सत्यवान माशाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाचे काम पोलिस हेड कॉन्स्टेबल आय. जी. शेख पाहतात.

Web Title: Police Recruitment Reserved Opportunity

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..