
Pune Padavidhar Election
esakal
पाच जिल्ह्यांतील ५८ तालुक्यांत मतदार साधारण पाच लाख मतदार असण्याची शक्यता १ ऑगस्ट २०२२ नंतरचे सर्व पदवीधर मतदार होऊ शकतात कोणत्याही अधिकृत विद्यापीठाची पदवी मतदार होण्यासाठी ग्राह्य
मतदार होण्यासाठी पाच जिल्ह्यांतीलच निवासी पत्ता आधारकार्डवर आवश्यक निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच्या नोटिफिकेशनपर्यंत मतदार नोंदणी शक्य
टप्प्याटप्प्याने नोंदणीचा कार्यक्रम जाहीर मतदार नोंदणीची सूचना ३० सप्टेंबरला प्रसिद्ध होणार नोंदणी टप्प्याची अंतिम यादी ३० डिसेंबरला प्रसिद्ध होणार, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नागपूर या तीन मतदारसंघांत निवडणूक डिसेंबर २०२६ मध्ये होणार प्रत्यक्षात मतदान
Pune Padvidhar Voter Registration : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपने तयारी सुरू केली आहे. मतदारसंघातील पाचही जिल्ह्यांतून इच्छुकांनी दौरे सुरू केले आहेत. नुकताच मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे पुढील वर्षी निवडणूक असली तरीही त्याची तयारी आता सुरू झाली आहे.