
कोल्हापूर : शेती उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती सोनल शरद पाटील यांनी नुकताच राजीनामा दिला. त्यापाठोपाठ सभापतींच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे, मात्र सभापतीपदाबाबत पक्षाच्या नेत्यांकडून कोणतीही सूचना आलेली नाही. त्यामुळे तूर्त मी राजीनामा देण्याचा विषय नाही,’ असे सांगत बाजार समितीचे सभापती ॲड. प्रकाश देसाई यांनी सभापती बदलाच्या चर्चेला तूर्त ब्रेक लावला आहे.