महायुतीचे आमदार क्षीरसागर यांनी महामार्गाच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. असे असले तरी महायुतीतील वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार अशोकराव माने यांनी विरोधाची भूमिका घेतली आहे.
-प्रवीण देसाई
कोल्हापूर : प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गावरून (Nagpur-Goa Shaktipeeth Highway) कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय धूमशान सुरू झाले आहे. यामध्ये काँग्रेसचे (Congress) विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे पहायला मिळत आहे. याला विधानसभा निवडणुकीची किनार असून ‘शक्तिपीठ’च्या निमित्ताने हा राजकीय संघर्ष उफाळून आला आहे.