

रेल्वेच्या प्रवासातील ‘खाद्य सेवा’ निकृष्ट, प्रवाशांच्या पैशांसह आरोग्याची लूट
esakal
Poor Food Quality Raiway : शिवाजी यादव : रेल्वेच्या दीर्घ प्रवासात मिळणारी खाद्य सेवा कधी चांगली तर कधी निकृष्ट मिळते. त्यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांना पैसे मोजून मनस्ताप सोसत पोटही बिघडवून घेण्याची वेळ येते आहे. रेल्वे प्रशासनाकडून खाद्य सेवांचे ठेके देताना होणारा दुजाभाव आणि त्यातील आर्थिक व्यवहारांचा फटका प्रवाशांना बसत आहे. याबाबत जाब विचारणारा कोणी नसल्याने प्रवाशांनी निकृष्ट खाद्य सेवांच्या तक्रारी पुराव्यासह देणे आवश्यक आहे.