कळंबा : केंद्र शासन (Central Govt) पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) ग्रामीण टप्पा दोन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेतून करवीर तालुक्यातील ११८ गावांमधील ४ हजार ६८८ लाभार्थ्यांच्या खात्यावर बारा कोटी २३ लाख पाच हजार रुपयांचे अनुदान जमा झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बेघरांना हक्काचा निवारा मिळणार आहे.