
Kolhapur Distirct Planing : कोल्हापूर जिल्हा नियोजन समिती आणि अन्य समित्यांवरील सदस्य निवडण्यासाठी महायुतीचे एकमत झालेले नाही. पालकमंत्री आणि त्यांच्या पक्षाला ६० टक्के जागा, तर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना प्रत्येकी २० टक्के जागा देण्यात याव्यात, असे जागा वाटपाचे सूत्र ठरले आहे. मात्र, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने याला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे जागा वाटपाचे समान सूत्र ठरवावे, अशी मागणी भाजपकडून होत आहे.