
कोल्हापूर : जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाच्या मंत्र्यांकडे पालकमंत्रिपद, असे सूत्र ठरल्यास जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी नूतन मंत्री प्रकाश आबिटकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच जिल्ह्यातील दुसरे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सांगली जिल्ह्याची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.