esakal | विनाकारण जो आडवा येईल त्याचा कार्यक्रम केला जाईल; आवाडेंचा इशारा I Political
sakal

बोलून बातमी शोधा

विनाकारण जो आडवा येईल त्याचा कार्यक्रम केला जाईल; आवाडेंचा इशारा

चांगला कारभार आणि शहराचा विकास या उद्देशाने सत्तेत गेलो असलो तरी काही मंडळींनी आडवा पाय मारत आम्हाला काम करू दिले नाही

विनाकारण जो आडवा येईल त्याचा कार्यक्रम केला जाईल; आवाडेंचा इशारा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

इचलकरंजी : कोरोना काळात इचलकरंजी पालिकेने जनतेसाठी कवडीचाही निधी खर्च केला गेला नाही. चांगला कारभार आणि शहराचा विकास या उद्देशाने सत्तेत गेलो असलो तरी काही मंडळींनी आडवा पाय मारत आम्हाला काम करू दिले नाही, असा गंभीर आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी केला. काही दिवसांपूर्वी पालिका सत्तेतून बाहेर पडणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर येथील ताराराणी पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना पालिका कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडत आमदार आवाडे यांनी आक्रमक शब्दात भूमिका मांडली.

हेही वाचा: खवय्यांच्या पसंतीची राधानगरीची दूध आमटी महाराष्ट्रात प्रथम

ते म्हणाले, 'कोरोना काळात इचलकरंजी पालिका जनतेच्या औषधोपचारासाठी पैसा खर्च करु शकली नाही. पत्रव्यवहार करून सहकार्याची तयारी दर्शविली तरी निधीच शिल्लक नसल्याचे कळविले. अशी सत्ता नको म्हणूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सत्तेतील काही मंडळीवरील नाराजीमुळे त्यांना दूर करून आम्हाला सत्तेत सहभागी करून घेतले. पण आम्हांला अपेक्षित काम करू दिले जात नाही. कचरा डेपो असो, कट्टीमोळा पाणी योजना असो सतत आडवा पाय मारत, मक्तेदाराला दम भरत काम करू दिले जात नाही. १०० शुध्द पेयजल प्रकल्पांसाठी निधी आणून दिला. पण आवाडेंना श्रेय मिळणार म्हणून ते रखडवले आहे.'

हेही वाचा: लोककलावंताची चित्तरकथा; गायिका रुबाबबी यांचा आयुष्याशी संघर्ष

ते म्हणाले, 'नगरपरिषदेत केवळ आरोप-प्रत्यारोप सुरू असून तेथील कारभार जगजाहीर आहे. हे चित्र बदलण्यासाठी ताराराणी पक्ष कोणतीही युती, आघाडी न करता सर्वच जागा स्वबळावर लढविणार आहे. विधान सभेतील झंझावाताप्रमाणे पालिका निवडणूकीत ताराराणी पक्षाचे वादळ निर्माण होईल. आतापर्यंत राजकारणात नकारात्मक वागत कोणालाही हिसका दाखविण्यासाठी आमची ताकद वापरलेली नाही. परंतु काळानुरुप काही तत्वांना छेद देत मार्गक्रमण करायचा निर्णय घेतला आहे. कार्यक्रम करायचाच हे ठरवून पुढे जात आहे. विनाकारण जो आडवा येईल त्याचा कार्यक्रम निश्‍चितपणे केला जाईल.'

loading image
go to top