लोककलावंताची चित्तरकथा; गायिका रुबाबबी यांचा आयुष्याशी संघर्ष

लोककलावंताची चित्तरकथा; गायिका रुबाबबी यांचा आयुष्याशी संघर्ष
Summary

लहाणपणी त्यांनी सांगोला येथील संगीत विशारद नामदेव डोंगरे यांच्याकडे त्यांनी गायनाचे धडेही गिरवले होते.

सांगली : गरिबी पाचवीलाच पूजलेली. लग्नानंतरही तेच भोग... पण त्यांना तारले ते माहेरी लहाणपणी जोपासलेल्या भजनांमुळेच. वडिलांमुळे त्या भजन गायला लागल्या. पुढे त्याच कलेतून जगण्याला आधार मिळाला. पोटासाठी त्या बॅंडपथकात गायल्या. पुढे शासनाच्या विविध लोकप्रबोधनाच्या चळवळीचा त्या भाग झाल्या. भारुड- वाघ्या मुरळीची गीते गाऊन त्यांनी संसार रेटला. आयुष्याशी हा संघर्ष सुरू असताना त्यांना कर्करोगाने गाठले. नुकतीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालीय. आता त्या अंथरुणावर खिळल्या आहेत. ही चित्तरकथा आहे करगणी (ता. आटपाडी) येथील गायिका रुबाबबी फैजुद्दीन शेख यांची.

रुबाबबी यांचे माहेर सांगोला तालुक्यातले चोपडी. घरी वडील भजनाची परंपरा. लग्नानंतर त्या सासरी आल्या मात्र पतीला व्यसन जडले. त्यात घरची चार-पाच एकर शेती संपली. पदरात एकुलता एक मुलगा. संसाराचा गाडा ओढताना त्यांनी शेतमजुरी केली. मात्र गायनाच्या कलेने त्यांना जगताना आधार दिला. तमाशा-ऑर्केस्ट्रात त्या गायला लागल्या. त्यांचे वडील व चुलते हे उत्कृष्ट ढोलकीपटू व गायक होते. लहाणपणी त्यांनी सांगोला येथील संगीत विशारद नामदेव डोंगरे यांच्याकडे त्यांनी गायनाचे धडेही गिरवले होते. ते सारे कामी आले.

लोककलावंताची चित्तरकथा; गायिका रुबाबबी यांचा आयुष्याशी संघर्ष
आठ दिवसांत पंचनामे, नंतर मदत : विजय वडेट्टीवार

पुढे त्यांनी वाघ्या मुरळी पथकातून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. सुपारी मिळेल तिकडे जायचे. त्यातून त्यांना करगणीचे शाहीर बाळासाहेब लांडगे यांच्यासोबत जिल्हा परिषदेच्या उपक्रमात सहभागाची संधी मिळाली. शाहीर बजरंग आंबी, देवानंद माळी यांच्यासमवेत त्यांनी राज्यभरातील अनेक जिल्हा परिषदांच्या उपक्रमात भाग घेतला. पुणे जिल्हा परिषदेच्या आळंदी ते पंढरपूर प्रबोधन वारीतही त्यांनी दरवर्षी भाग घेतला. स्त्री भ्रुण हत्या, एड्‌स जागृती, महिला अत्याचार अशा समस्यांच्या जागृतीसाठी त्यांनी शाहिरांच्या खांद्याला खांदा लावून प्रबोधन केले. मिळेल त्या बिदागीवर लोककलेप्रती निष्ठा ठेवून काम केले.

काही महिन्यांपूर्वी त्या त्या कलाकार मानधनासाठी म्हणून सांगलीत जिल्हा परिषदेत आल्या होत्या. यावेळी त्यांची प्रकृती नाजूक पाहून मानधन समितीचे सदस्य अविनाश कुदळे यांनी चौकशी केली असता कर्करोग झाल्याचे समजले. पैशाअभावी उपचार करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची व्यथा ऐकून कुदळे आणि समितीचे अध्यक्ष महादेव पाटील यांनी आधी उपचारासाठी तातडीने धडपड करीत डॉ. रवींद्र वाळवेकर व डॉ. श्रीनिकेतन काळे यांच्याकडे संपर्क साधला. त्यांनी आठवडाभरात सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल करीत महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उपचाराची सोय केली.

लोककलावंताची चित्तरकथा; गायिका रुबाबबी यांचा आयुष्याशी संघर्ष
कोकेन, चरस अन् मेफेड्रोन... मोठ्या सेलेब्रेटिंचा 'दम मारो दम'

आता रुबाबबी यांची प्रकृती सुधारत आहे. मात्र हातावरचे पोट असलेल्या या लोककलावंतापुढे आता जगण्याचे प्रश्‍न उभे आहेत. अंथरुणाला खिळलेल्या अवस्थेत त्या आहेत. सध्याच्या हालाखीच्या परिस्थितीत त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. एक लोककलाकारासाठी समाजाने पुढे येऊन मदतीचा हात द्यायला हवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com