
कोल्हापूर : यंदाच्या मे महिन्यात जूनसारख्या पावसाची प्रचिती आली आहे. मे महिन्यात वळीव पाऊस पडणे अपेक्षित होते; परंतु गेल्या आठ दिवसांपासून सतत पाऊस सुरूच आहे. त्यातच मॉन्सूनपूर्व पावसाचे लवकर आगमन झाले आहे. त्यामुळे पावसाचे वेळापत्रकच बदलल्याचे दिसत आहे. या मे महिन्यात शुक्रवारपर्यंत ३६.१ मि.मी. पाऊस पडला आहे. तर गेल्या पाच वर्षांत या महिन्यामध्ये ५८ मि.मी.च्या पुढे पाऊस पडला आहे.