Kolhapur : काेल्हापूर जिल्ह्यात ५३ हजार हेक्टरवर पेरण्या; भाताची क्षेत्र सर्वाधिक, मॉन्सूनपूर्व पावसाने पिकांचे नुकसान
काही ठिकाणी जमिनीतील ओलावा कमी झाला नसल्याने खरीप हंगामासाठी जमिनीची पूर्वमशागती करण्यात अडचणी येत आहेत. जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात भाताची धूळवाफ पेरणी केली जाते, तसेच उर्वरित क्षेत्रामध्ये रोपलागण केली जाते. घात आलेल्या क्षेत्रावर पेरण्यांना सुरुवात झाली आहे.
Kolhapur Sees Major Paddy Cultivation; Rainfall Causes Crop Lossesakal
कुडित्रे : जिल्ह्यात १८ जूनपर्यंत १८६.० मिलिमीटर (५१.३ टक्के) पाऊस झाला. आता थोडीफार उघडीप दिल्याने घात साधून शेतकऱ्यांनी पेरण्या साधून घेतल्या. जिल्ह्यात आतापर्यंत ५३ हजार ५८० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.