
कोल्हापूर : कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील पक्षकार, वकिलांनी ४० वर्षे दिलेल्या लढ्याला यश आले आहे. १७ ऑगस्टला दुपारी साडेतीन वाजता सर्किट बेंच उद्घाटन सोहळा होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणाऱ्या सोहळ्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सहा जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी, जिल्हा व तालुका न्यायालयातील न्यायाधीश उपस्थित राहणार आहेत. मेरी वेदर ग्राउंडवर होणाऱ्या कार्यक्रमाला चार हजारांवर वकिलांचीही उपस्थिती असेल. खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक तथा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. व्ही. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.