esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

नृसिंहवाडी मंदिर

दसरा महोत्सवाची नृसिंहवाडीत तयारी पूर्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नृसिंहवाडी : येथे उद्या (ता. १५) होणाऱ्या दसरा महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. चातुर्मासानिमित्त गुरुपौर्णिमेपासून बंद असलेला येथील मंदिरातील पालखी सोहळा उद्यापासून सुरू होत आहे. कोरोनाच्या प्रादुभावानंतरचा पहिलाच उत्सव असल्याने मास्क, गर्दी होऊ नये यासाठी सुरक्षारक्षक, सॅनिटायझर आदी नियोजन केले आहे.

हेही वाचा: मंत्री जितेंद्र आव्हाडांना मारहाण प्रकरणात अटक: किरीट सोमय्या

येथील दत्त देव संस्थानमार्फत मुख्य मंदिर व परिसरातील मंदिरे धुऊन स्वच्छ करण्यात आली. मुख्य मंदिराला रंगरंगोटी केली आहे. श्रींची व उत्सवमूर्तीची भरजरी वस्त्रे तसेच पालखीतील रेशमी वस्त्रे आदींची तयारी करण्यात आली. येथील सेवेकरी मंडळींनी श्रींची पालखी आकर्षक शालू व भरजरी वस्त्रांनी बांधून घेतली आहे.

दसरा महोत्सवानिमित्त दत्त मंदिरात पहाटे साडेचारला काकड आरती, सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत अभिषेक व पंचामृत पूजा, साडेबाराला श्रींचे चरणकमलावर महापूजा, तीनला पवमान पंचसूक्त पठण, साडेचारला धूप व दीप झाल्यावर श्रींची उत्सवमूर्ती नारायणस्वामींचे मठातून मुख्य मंदिरात आणण्यात येईल व सायंकाळी पाचच्या दरम्यान श्रींच्या पालखी सोहळ्यास प्रारंभ होईल. कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमाजवळील दसरा चौकात सीमोल्लंघन व धार्मिक पूजेचा कार्यक्रम होऊन श्रींची पालखी पुन्हा मंदिरात येईल. प्रार्थना वगैरे नित्याचे कार्यक्रम होऊन दहाला शेजारती असे कार्यक्रम होणार आहेत.

loading image
go to top