कोल्हापूर : राजर्षी शाहूंचा विचार कृतीतून जपा; श्रीमंत शाहू छत्रपती महाराज

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला साधला ‘सकाळ’शी संवाद
कोल्हापूर : राजर्षी शाहूंचा विचार कृतीतून जपा; श्रीमंत शाहू छत्रपती महाराज
Updated on

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज(rajrshi shahu maharaj) यांचा विचार नुसता बोलण्यातून नव्हे, तर कृतीतून जपला जावा, अशी अपेक्षा श्रीमंत शाहू छत्रपती महाराज(shriman shahu chtrpati maharaj) यांनी आज व्यक्त केली. उद्या (ता. ७) महाराजांचा वाढदिवस साजरा होत असून, त्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने (sakal)त्यांच्याशी संवाद साधला.श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, ‘‘काळ कितीही बदलला तरी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे काम आजही समाजाच्या सर्वांगांना व्यापणारे आहे. समाजातील एकही घटक असा नाही की महाराजांनी त्यात योगदान दिले नाही. सामान्यातील सामान्य माणूस तसेच जो वर्ग वंचित आहे त्याला त्यांनी आपले मानले. काळ बदलत गेला; पण त्यांचे काही मागे पडले नाहीत. छत्रपती शाहू महाराज किती चांगले होते, हे सांगण्याऐवजी त्यांचा विचार कृतीतून पुढे आला तर नव्या पिढीला तो प्रेरणादायी ठरेल.’’

कोल्हापूर : राजर्षी शाहूंचा विचार कृतीतून जपा; श्रीमंत शाहू छत्रपती महाराज
KDCC Bank Elections Result : सत्ताधाऱ्यांचा एकतर्फी विजय

कोल्हापूरच्या विकासाबाबत बोलायचे तर आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे, असे सांगून ते म्हणाले, ‘‘आता कुठे आपण विमानतळाच्या दृष्टीने वाटचाल करत आहोत. विकास करायचा म्हणजे नेमके काय करायचे, याचा निश्‍चित असा आराखडा डोळ्यांसमोर ठेवायला हवा. सिंगापूरचे उदाहरण द्यायचे तर दहा बारा वर्षांपूर्वीच स्वच्छतेसह अन्य बाबतीत सिंगापूर पुढारले होते. शहरे कशी विकसित झाली हे पाहायचे असेल तर परदेशात जायला हवे.’’शहराची हद्दवाढ व्हायलाच हवी याबाबत दुमत नाही. मात्र रस्ते, कचरा उठाव अधिक नीट होतो, का हे तपासायला हवे. गावे शहराच्या हद्दीत येणार असतील तर तेथे तशा सुविधा द्यायला हव्यात अन्यथा त्यांना आत घेऊन तेथे कचरा वाढविण्याशिवाय दुसरे आपण काय करणार आहोत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

कोल्हापूर : राजर्षी शाहूंचा विचार कृतीतून जपा; श्रीमंत शाहू छत्रपती महाराज
पत्रकारांनी वस्तुनिष्ठ पत्रकारिता करावी ; उत्तम दिघे

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्याकाळी विकासाचे स्वप्न पाहिले. त्यांनी शेती तसेच औद्यागिकीकरणावर भर दिला. त्यांचे विकासाचे मॉडेल आजही तंतोतंत लागू पडते. सामाजिक सुधारणा करत विकास कसा साधता येतो, हे त्यांनी सिद्ध केले. त्यांच्या एकेका पैलूचा अभ्यास करून कोल्हापूरच्या विकासाचे स्वप्न पाहिले तर त्यात निश्‍चितपणे यश मिळेल. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी पुढील १०० वर्षांचे काम उभे केले. आज तर आपल्याकडे दळणवळणाच्या सर्व सुविधा आहेत, याचा विचार केला पाहिजे, असेही ते आवर्जुन म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Ajra schoolgirl death news
Ramtirth Waterfall Ajara after heavy rainfall
Gokul Election Resolution Controversy kolhapur vinya kore, hasan mushrif, satej patil, prakash abitkar, dhnanjay mahadik, mahadevrao mahadik
Kolhapur child accident latest news
Marathi News Esakal
www.esakal.com