
कोल्हापूर :आराम बस कोल्हापुरातून महामार्गावर पुणे किंवा मुंबई प्रवासासाठी सुटली की वाटेत चार ठिकाणी पथकर (टोल) द्यावा लागतो. तो पाचशे रुपयांच्या घरात जातो. एका आराम बससाठी महिन्याकाठी २५ ते ३० हजार रुपये पथकर भरावा लागतो. त्या तुलनेत सुविधा मिळत नाहीत. पाच वेगवेगळे कर आराम बसमालकांना भरताना खर्चाचा भाव वाढतो. परिणामी अव्वाच्या सव्वा भाडेवाढ करून प्रवाशांच्या माथी मारावी लागत आहे.