esakal | 'मराठा आरक्षणासाठी पुन्हा आर-पारची लढाई'
sakal

बोलून बातमी शोधा

'मराठा आरक्षणासाठी पुन्हा आर-पारची लढाई'

'मराठा आरक्षणासाठी पुन्हा आर-पारची लढाई'

sakal_logo
By
युवराज पाटील

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी (maratha reservation) पुन्हा आर-पारच्या लढाईचा निर्धार व्यक्त करताना शुक्रवारी (२८) छत्रपती शिवाजी चौकात धरणे आंदोलन (protest on friday) करण्याचा निर्णय आज येथे झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत झाला. शिवाजी पेठेतील शिवाजी तरूण मंडळात ही बैठक झाली. धरणे आंदोलनाला जिल्ह्यातील सर्व (kolhapur distrcit लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

मराठा आरक्षणावर निर्णयासाठी राज्य शासनाने विशेष अधिवेशन बोलवावे, निर्णय होईपर्यंत समाजातील मुलांना शैक्षणिक सवलती द्याव्यात आदी मागण्या यावेळी झाल्या. त्याशिवाय लवकरच वकिलांची परिषद घेवून कायदेशीर लढाईसाठीही सज्ज राहण्याचा निर्णय बैठकीत झाला. बैठकीला शिवाजी तरूण मंडळाचे अध्यक्ष सुजीत चव्हाण, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, ॲड. बाबा इंदूलकर, बाळ घाटगे, निवासराव साळोखे, सुरेश जरग, किशोर घाटगे, संदीप मोहिते, दिलीप देसाई आदी उपस्थित होते.

हेही वाचा: फेसबुक, ट्विटरच्या बंदीनंतर पुढचा नंबर कुणाचा?