
AIMIM Office in Kolhapur
esakal
निदर्शनामुळे कार्यक्रम रद्द – कोल्हापूरातील बागल चौकात एमआयएम पक्ष कार्यालयाचे उद्घाटन खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या हस्ते होणार होते; मात्र हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या निदर्शनांमुळे ते कार्यक्रमाला हजर राहिले नाहीत.
तणावपूर्ण वातावरण – बागल चौकात सकाळपासूनच मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ओवेसींचा विरोध केला, ज्यामुळे वाहतूक कोंडी आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले.
परिस्थिती नियंत्रणात – पोलिसांनी संवाद साधून निदर्शकांना हटवले. दुपारी तणाव निवळला; दरम्यान ओवेसी विमानतळावर पोहोचल्यावर त्यांच्या समर्थकांनी ‘शेर आया रे शेर आया’ अशा घोषणांनी स्वागत केले.
AIMIM Office Opposition : ‘एमआयएम’ पक्षाचे जिल्हा कार्यालय बागल चौक येथे होणार आहे. त्याच्या उद्घाटनासाठी आज पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी येणार असल्याचे कळताच हिंदुत्ववाद्यांनी तेथे निदर्शने केली. त्यामुळे बागल चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने ओवेसी तेथे आले नाहीत.