

Pune Bangalore Highway Expansion news
esakal
Pune Bengaluru highway update : (अभिजित कुलकर्णी) पेठ नाक्याच्या पुढे नेर्लेपासून सातारा या अंतरात महामार्ग सहापदरीकरण अंतिम टप्प्यात आहे. सेवा मार्गावरील छोटे पूल, दुभाजकांची दुरुस्ती आणि वृक्षारोपण, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक रेलिंग व पांढरे पट्टे, पावसाचे पाणी महामार्गावर साचू नये यासाठी बांधण्यात आलेल्या गटर्सची कनेक्टिव्हिटी अशी अनेक छोटी-मोठी कामे प्रलंबित आहेत.