

Pune Bunty Babli loan fraud news
esakal
Kolhapur Business Fraud : वीस कोटींचे व्यावसायिक कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने प्रोसेसिंग फी म्हणून साखर व्यापाऱ्याकडून तब्बल ६५ लाखांची रक्कम उकळून फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी मनीष नानासाहेब उर्फ नानाजी देशमुख व संगीता मनीष देशमुख (दोघे रा. गोल्डन कॅस्टल, बालेवाडी, पुणे) या दांपत्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.