Online Friendship Turns Dangerous
esakal
Pune Girl Cheated via Social Media : पुण्यातील एका तरुणीची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, कोल्हापूरमधील दोन तरुणांमुळे त्या तरुणीला सुखरूपपणे तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर या दोन तरुणांचं कौतुक केलं जात आहे. कोल्हापूरकरांच्या माणुसकीमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या घटनेने पुन्हा एकदा सोशल मीडियावरील अनोळखी मैत्रीच्या धोक्यांकडे लक्ष वेधलं आहे.