Pune Graduate Constituency : पदवीधरसाठी महायुतीतच होणार रस्सीखेच भाजप, राष्ट्रवादीचा दावा ; ‘महाविकास’कडे तयारी केलेल्या उमेदवारांची वानवा

BJP and NCP Stake Claims for Pune Graduate Seat : पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दावेदारीची चर्चा सुरू आहे.
Pune Graduate Constituency

BJP-NCP Mahayuti

esakal

Updated on

कोल्हापूर : पुणे पदवीधर विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांतच रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीत या जागेवर महायुतीतील भाजप व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने दावा सांगितला आहे. कोल्हापुरातून जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने यांनी तयारी सुरू केली असून, त्यांच्यासाठी स्वतः मंत्री हसन मुश्रीफ मैदानात उतरले आहेत. सहा वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यावेळच्या एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड या मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

पण, अलीकडेच त्यांचे पुत्र शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारीची दावेदारी केली आहे. विशेष म्हणजे या आतापर्यंतचे पदवीधरचे आमदार असे १९६० ते ६६ - वासुदेव गोगटे- हिंदू महासभा १९६६ ते ८४ - प्रा. ग. प्र. प्रधान - समाजवादी पार्टी १९८४ ते ९० - नारायण श्रीपाद वैद्य - भाजप १९९० ते २००२ - प्रकाश जावडेकर - भाजप २००२ ते २००८ - प्रा. शरद पाटील - जनता दल २००८ ते २०१९ - मंत्री चंद्रकांत पाटील- भाजप २०२० ते २०२६ - अरुण लाड - राष्ट्रवादी काँग्रेस

Pune Graduate Constituency
Maharashtra Drought Survey : दुष्काळी पंचनामे आजपासून; चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती

मतदारसंघाचे दोनवेळा प्रतिनिधीत्व केलेले मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यासाठी कंबर कसली आहे. मंत्री पाटील यांच्या उपस्थितीतच शरद लाड यांचा भाजप प्रवेश झाला, त्या कार्यक्रमातच मंत्री पाटील यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. दुसरीकडे गेल्या निवडणुकीत भाजपने ऐनवेळी उमेदवार बदलला, त्याचा फटका बसला. यावेळी जिल्ह्यातून माणिक पाटील-चुयेकर हे भाजपकडून इच्छुक आहेत. पक्षाकडूनही त्यांचे एकमेव नाव प्रदेश पातळीवर गेले आहे. त्यामुळे तेही प्रबळ दावेदार समजले जातात. आतापर्यंत या मतदारसंघात एकदाही काँग्रेसला विजय मिळवता आलेला नाही.

सहा वर्षांपूर्वी महाविकास आघाडीची राज्यात सत्ता होती. मंत्री म्हणून मुश्रीफ, आमदार सतेज पाटील आणि पाच जिल्ह्यांतील काँग्रेस, एकत्रित राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांच्या प्रयत्नामुळे अरुण लाड यांचा विजय सोपा झाला होता. या निवडणुकीत त्यावेळी भाजपकडून संग्राम देशमुख यांना उमेदवारी मिळाली होती. पण, त्यांचा पराभव झाला. आता महायुतीच्या झेंड्याखाली भाजपसह राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, शिवसेना शिंदे पक्ष व जनसुराज्यसह अन्य छोटे पक्ष एकत्र आहेत.

या मतदारसंघाचे विद्यमान आमदार अरुण लाड हे राष्ट्रवादीतून निवडून आले आहेत. या जोरावर ही जागा राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीलाच मिळावी, असा आग्रह मंत्री मुश्रीफ यांचा आहे. त्यासाठी त्यांनी अलीकडेच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन प्रताप माने यांना ‘प्रमोट’ करण्यास सुरुवात केली आहे. पण, लाड यांचे चिरंजीव भाजपमध्ये आल्याने ही जागा भाजपसाठीच हवी, असा आग्रह भाजप नेत्यांचा आणि विशेषतः मंत्री पाटील यांचा आहे. राज्यातील पाच जागांसाठी ही निवडणूक जाहीर झाली आहे.

Pune Graduate Constituency
Gondia Maternal Tragedy : प्रसूतीपूर्वीच बाळाचा मृत्यू; उपचारादरम्यान आईनेही सोडला जीव

त्यात साटेलोटे होऊन कोणती जागा कोणाच्या वाट्याला येणार, यावर लढतीचे चित्र अवलंबून आहे. सद्य:स्थितीत काँग्रेस किंवा महाविकास आघाडीकडे तयारी केलेल्या उमेदवारांची वानवा आहे. महाविकासमध्‍ये नगरसेवक सुनील मोदी व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून हर्षदा जाधव-देशमुख यांची नावे चर्चेत आहेत. हर्षदा या निवृत्त विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या कन्या आहेत. त्यांच्या मागे ‘रयत’ची ताकद लागू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com